बालपण
 ।। बालपण।।ते क्षण हातातले निसटूनिया गेले |

त्या आठवणी मज स्पर्श करून गेले ||


नभातील पाखरासारखे उडुनिया गेले |

नदीतील पाण्यासारखे वाहुनिया गेले ||


इतक्या सहज कसे गेले ते मज सोडूनी |

हाच विचार नेहमी दरवळत राही मनी ||


आता भेट माझी त्या संगे कधीही न होई |

त्या विचाराने मन घायाळ होऊन जाई ||


परत भेटाया माझा जीव आतून लागे तुटू |

पण नाही होणार भेट हे सत्य आहे कटु ||


नाही उरला काळ ते गोड क्षण परतण्याला |

एकदाच होती साथ त्याची आयुष्याला ||


पर्याय नव्हता त्याला निघून जाण्याला |

कसे समजावू माझ्या या वेड्या मनाला ||


गेले निघून आयुष्यातुनी ते प्रेमळ क्षण |

राहून गेली मनात सुंदर अशी आठवण ||


                        - मिजेबा फरद्दीन जमादार

Post a Comment

0 Comments