Advertisement

महिलांचा दिवस तसा असतो रोजच..

ती


महिलांचा दिवस तसा
 असतो रोजच
कारण तिच्याशिवाय
पान हलत नसतं कोणाचंच

सकाळ झाली की
हातात झाडू घेते
चहा पाणी नाश्ता करण्यात
तिची सकाळ उलटून जाते


घरभर  झालेला पसारा
एकटीच आवरत असते
कोणाला काय हवे
यावर बारीक लक्ष ठेवते

 घराला घरपण देता देता 
स्वतःचे बाईपण विसरून जाते
घरातल्या लहान थोरांसाठी 
 ती मर मर मरत असते


हट्ट सर्वांचे ती पुरवित असते
ज्याला जे हवे ते शिजवत असते
स्वतःच्या आवडी निवडीकडे
कानाडोळा करीत असते


घरात चौफैर नजर तिची असते
काय हवे नको यातच ती रमते    
सर्वांचे आजार बरे करता करता 
ती स्वतः मात्र खंगत असते

घरखर्चासाठी  मिळालेल्या पैशातून
तांदळाच्या डब्याची बँक करते
झालाच पतिचा पगार उशिरा
तर हातात त्याच्या नोटा देते

जिथं जाते होते तिथली
सासर असो वा असो माहेर 
दोन्ही घरांची शान राखताना
सोन्यासारख्या देहाचे करते मातेरं

कवियत्री - पौर्णिमा शिंपी

Post a Comment

0 Comments