Advertisement

कधी ना उलगडे जीवनाचे कोडे..

 जीवनकधी ना उलगडे जीवनाचे कोडे

सोडवावे तेवढे अधिकच गुंता वाढे

कधी मनभरून जगावे

कधी मन मारून सोसावे


पावलोपावली संघर्षाचे जाळे

केव्हा पाय अडकतील हे ना कळे

कधी पावले टाकावी जपून

कधी चालावे निखारे समजूनएका क्षणाला डोळी अश्रू येई

दुसऱ्या क्षणाला ओठी हसू येई

अश्रू ते घ्यावे पूसूनी

ओठी हसू कायम राखूनीआज आहे ते उद्या नसणार आहे

उद्या नवीन काय मांडलय 

हे आज न कळणार आहे

सारंच काही इथं नश्वर आहे

तरीही हव्यासापोटी इथं सर्व तत्पर आहे.सुखामध्ये सर्वच असती सोबत इथं

दुःखात मात्र पाठ फिरवती इथं

कुणाचे फासे सरळ पडतील इथं

तर कुणी स्वतःच फास लावून 

जीवन ज्योत संपवी इथं...


कवियत्री - पौर्णिमा शिंपी

Post a Comment

0 Comments