• माझं भिताड •

 • माझं भिताड •.
भिंत सुद्धा बोलू पाहते माझ्याशी,
ओल येते तिच्या गर्भातल्या बाळाशी.
माझं मन दाटून आलंय, हे तिला बरं कळतं,
कोणाचंच वळत नाही, तिचं मन बरं वळतं.
करडा रंग दिलाय मी तिला, आत बाहेर वेगळं नको,
म्हणूनच कि काय मी सावळा आहे, त्यात भेद नको.
एकीकडे काटा रूतला कि भोकाड पसरणारा मी,
आणि दुसरीकडे खिळ्याला कवटाळून बाहूत घेणारी ती.
माझं पांघरूण रोज किमान चारदा तरी झटकतो मी आताशा,
तिच्यावर उमटवलेले हाताचे ठसे म्हणजे कायमचा गाशागोशा.
जवळपास माझ्यासारखीच अवस्था कि हो, नग्न सताड,
काहितरी सांगू पाहातं व्यक्त होऊ पाहातं, माझं भिताड.!

Writer - Suyash Zunjurke

Post a Comment

0 Comments