Advertisement

हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा

 


✍🏻


आपली पहिली कविता, पहिला लेख, पहिली चारोळी आपण कधीच विसरत नाही...

मी लहान असताना बाबांच्या हरिपाठ म्हणण्याचे शब्द माझ्या कानावर पडायचे..


"हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा

पुण्याची गणना कोण करी..?"


त्या हरिपाठाचे शब्द मनात इतके खोलवर रुजले होते की, माझ्या वयाच्या बारा ते तेराव्या वर्षी मी माझी पहिली कविता हरिपाठाला प्रेरित होऊन लिहिली होती.. या कवितेमध्ये माझी आणि माझ्या मित्राची अभ्यास न करण्याची कारणं सांगितली होती..

आणि आज पुन्हा मी माझी पहिली कविता आपल्या गंधर्व मराठी परिवारासमोर सादर करू इच्छितो..


_विकी म्हणे तुला, विकी म्हणे तुला_

_रोजची अभ्यास कोण करी?_

_सकाळ पहारी जहाली न्याहारी_

_पोटात गुरगुरी आली खरोखरी_

_विकी म्हणे तुला विकी म्हणे तुला_

_रोजची अभ्यास कोण करी?_

_मध्यान वेळी, दप्तरावरी सांडलीये करी_

_झोप सुद्धा आली डोळ्यावरी_

_विकी म्हणे तुला विकी म्हणे तुला_

_रोजची अभ्यास कोण करी?_

_संध्या वेळी येता घरी,_

_मित्र मंडळी मैदानावरी.._

_रात्री मात्र लाऊनी घडी,_

_अभ्यास होतो, थोडा तरी..!_!_


✍🏻 _विवेक..._

Post a Comment

0 Comments