Advertisement

बेघर जाहले | विषाणू वर्चस्व || लूटलं सर्वस्व |गरीबाचं ||

अभंग रचना
बेघर जाहले | विषाणू वर्चस्व || 
लूटलं सर्वस्व |गरीबाचं ||

फुटक्या नशीबी |प्रांताला परती ||
दुःखाला भरती |गरीबाच्या ||

काम ना मिळाले |रिकाम्या हाताला ||
जीव टांगणीला|गरीबाचा ||

फाटले कपडे |पायी ना वहाण ||
घर ही गहाण |गरीबाचं ||

महाग जाहला |भाकरी तुकडा ||
संसार उघडा |गरीबाचं ||

गाठोडी सांडली |गोधडी फाटली ||
आसवं आटली |गरीबाची ||

भूकेची लाचारी |परतली दारी ||
पडली पदरी |गरीबाच्या ||

उदरनिर्वाह | भागणार कैसा ||
तुटपूंजा पैसा | गरीबाचा||

उरलं आयुष्य | देवाच्या हवाली  ||
आस ही लावली | गरिबानं ||

कवियत्री - पौर्णिमा शिंपी

Post a Comment

0 Comments