Advertisement

मी काहीही लिहिले तरी

 मी काहीही लिहिले तरी
तू वाह काय म्हणतोस
कधी तर नाक मुरड

कधी तर लेखणी हिसकावून
माझी वही भिरकावून दे

वेडे असं काय
तुझ्या अंगाखांद्यावर खेळणारे शब्द

तुझ्या चेह-यातून परावर्तित होणारी किरणें

तुझ्या झुकलेल्या पापणीतला

आर्त भाव

तुझ्या ओठावरची अधिरता

तुझ्या लेखणिला सलाम करणारी
तुझ्या गालावर रुळणारी केसांची बट

सगळं सगळं
ईतके विलोभणिय असतं की

मी आपसुकच वाह म्हणुन जातो

सगळ्यात कहर म्हणजे तू
तुझ्याच कवितेला न्याहाळताना

मला तुझ्यातली कविता
डोळ्यात साठवता येते त्याचं काय?


- कल्पी जोशी

Post a Comment

0 Comments