Advertisement

तूझे बोलणे,तूझे हसणे
 तूझे बोलणे,तूझे हसणे

मनाला टाकतात बहरून।

असच बोलत राहावं तुझ्याशी

सगळी वेळ, सर्व भान विसरुन।।


तुझे ते बोलके नयन

मनाला घेतात आकर्षुन।

वाटते डोळ्यात तूझ्या वसावे

सगळी वेळ, सर्व भान विसरून।।


तूझी गोड मिठी गच्च

घ्यावी वाटते आवर्जुन।

तु ओठ टेकवावे माथी

सगळी वेळ, सर्व भान विसरून।।


प्रतिभा गौपाले.

नागपूर

Post a Comment

0 Comments