Advertisement

ती आँनलाईन असते

ती आँनलाईन असते
नेहमी आँनलाईन असते.

सकाळी ऊठुन नवर्‍याला डब्बा देते.
मुलांना शाळेत पाठवायची तयारी करते.
तरीही ती आँनलाईन असते.

घरचं सगळं आवरून स्वयंपाक करते.
दिवसभर सासु-सासर्‍यांची सेवा करते.
तरीही ती आँनलाईन असते.

धुणी भांडी करुन घर साफ ठेवते.
परत रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करते.
तरीही ती आँनलाईन असते.

ती आँनलाईन असते तर काय फरक पडते.
ती तर सगळ सांभाळून मोबाईल बघते....
आपला छंद जोपासते म्हणुन 
ती आँनलाईन असते....

कवियत्री - प्रतिभा गौपाले

Post a Comment

0 Comments