Advertisement

मराठी भाषा दिवस1) तोडून टाक बेड्या सर्व, आता तरी मुक्त हो

बाकीच्यांना जाऊ दे, तू मराठी भाषेचा भक्त हो

2) मराठमोळ्या भाषेला साखरेची चव आहे
कशाचीही उणीव नाही तर भाषेला तोड नाही
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

3) आपल्याला फक्त दोनच गोष्टी आवडतात
एक म्हणजे ढोल ताशा 
आणि दुसरी म्हणजे मराठी भाषा 
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

4) माय मराठीची अशी गोडी ही अवीट 
न लागावी कधी कुणाचीही दीठ
मायबोली साहित्याची संस्कृतीची शान 
राजभाषा गौरवावी थोर हिचा मान - रूपाली धात्रक 

5) मायबोली माझी मराठी 
तिच्यात मायेचा ओलावा 
वेगवेगळ्या शब्दालंकारात 
घेते हृदयातील खोलावा 

6) परीस स्पर्शापरी असे किर्तीवंत
आमची माय मराठी 
अंगाई, लावणी आणि पोवाड्यातही शोभते
आमची माय मराठी
संस्कृत आणि संस्कृतीच्या उदरात वसे
आमची माय मराठी
नानाविध शिलेदारांच्या यशोगाथेतही 
आमची माय मराठी - कुणाल परांजपे 

7) आवाज मोठा करण्यापेक्षा शब्दाची ताकद मोठी करते 
तलवारीच्या धारेपेक्षा मायमराठी उत्तम कार्य करते 

8) जात मराठी,धर्म मराठी
शान मराठी, अभिमान मराठी

9) मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम 
मराठी भाषा म्हणजे  संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी 

10) जगत राहावी, शिकत राहावी 
समजत राहावी, हसत राहावी अशी ही माया 
शब्दांच्याही पलीकडल्या भावनांना 
अखंड उमलवणारी ही मातृभाषेची कोवळी माया 

Post a Comment

0 Comments