Advertisement

इचलकरंजी शहर व परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांनी उच्छाद

इचलकरंजी शहर व परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून त्यावर तरी त्वरित उपाययोजना कराव्यात अन्यथा नगरपालिकेत भटकी कुत्री आणून सोडण्याचा इशारा माणुसकी फाऊंडेशन दिला
  कारंडे मळा येथे शेळ्या व लहान रेडकू यांचा भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्यांचा जीव घेतला त्याचबरोबर इचलकरंजी परिसरामध्ये अनेक भागांमध्ये कुत्र्यांनी चावा व लचका तोडला ज्या आणि घटना वारंवार घडत आहेत त्यास अनुसरून माणुसकी फाउंडेशन च्या वतीने इचलकरंजी नगरपालिका येथे निवेदन देण्यात आले पण सदर निवेदन देण्यात गेले असता आधी कल्पना देऊनी एक जबाबदार व्यक्ती म्हणून नगराध्यक्ष केबिनमध्ये किंवा इतर कोणीही उपस्थित नसल्याने माणुसकी फाउंडेशन च्या सर्व सदस्यांनी निषेधाच्या जोरदार घोषणाबाजी करत नगरपालिकेचा निषेध करण्यात आला सदर प्रसंगाचे गांभीर्य ओळखून आरोग्य सभापती संजय केंगार लेबर ऑफिसर राजापूरे हे निवेदन स्वीकारण्यास आले माणुसकी फाऊंडेशनच्या सदस्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत इचलकरंजी शहर हे औद्योगिक शहर असून आपल्या शहरांमध्ये 24 तास लोकांची वर्दळ सुरू असते यामध्ये अनेकदा रात्री अपरात्री कामानिमित्त बाहेर गेले असता अनेकदा या भटक्या कुत्र्या मुळे अनेकांना जीवांशी आलेले प्रकार घडले आहेत अनेकदा नगरपालिकेच्या निदर्शनात आणली अद्यापि आपण कोणतीही कारवाई केली नाही इचलकरंजी शहरांमध्ये  भटके कुत्र्यासाठी निबिजिकरणाची करण्याची प्रक्रिया  दरवर्षी राबवली जाते  पण त्यात सातत्य नसल्याने व त्याची नोंद व पाठपुरावा होत नसल्याने  द्यायचे त्या नसल्याने  समस्या वाढत आहे भविष्यात जर आपण या गंभीर प्रश्नाकडे लक्ष न दिल्यास माणुसकी फाउंडेशनच्यावतीने नगरपालिकेच्या दालनामध्ये भटकी कुत्री सोडून येणाऱ्या काळामध्ये या बाबतीत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माणुसकी फाउंडेशनच्या वतीने देण्यात आला
यावेळी माणुसकीचे अध्यक्ष रवी जावळे,अभिजित पटवा,प्रविण केर्ले,बंडा पाटील,धनाजी शेवाळे,आकाश नरुटे,बंडा मुळीक,आनंदा इंगवले,बाबू दिगस्कर,कृष्णा इंगळे,मधुर पाटील,आदित्य तेलंग,ऋषीकेश चव्हाण,दिलीप पाटील,अर्जुन माळी, गणेश आमने,मनीष जाधव,स्थेपन आवळे,ऋत्विक पेढणेकर,रणकीत रॉय,संजय शहापुरे,अभि संपगावे,

Post a Comment

0 Comments