Advertisement

त्या मंतरलेल्या रानी
त्या मंतरलेल्या रानी
मन हळवे वेड स्वरांचे
कळ सोसत आज मुक्याने
झेलते दु:ख जन्माचे

सावल्यान् मागुनी वाटा
पळ्तात रोधुनी श्वास
फरफटते नशीब अवघे
तरीही सम्पेना आस

फुलण्याआधीच कितीदा
कोमेजुन मोहोर जाई,
अंताचे नकोच ओझे
उगमाची एकच घाई!

या मंतरलेल्या रानी
आरसा असे डोहाचा
खळबळते लाट जराशी
चेहरा हसे काळाचा!


विस्तीर्ण नभाच्या खाली
धरती निजलेली शांत
मी अवघडले बावरले
तू घेता हाती हात…

मी काजळ भरले डोळा
अस्फुट अंधुकशा रेषा
बोललो जरी ना काही
डोळ्यांची कळली भाषा…

तो पहिला स्पर्श अनामिक
तो पहिला श्वासही ओला
मन माझे मोहरले हे
अन् उर धपापुन आला

मी उंच उंच जाताना
तू धरला माझा हात
मी फिरून आले खाली
मिठीच्या या विळख्यात…

दाटून काहीसे येते
का दूर दूर जाताना
मी फिरून येईन तेव्हा
तू असाच असशील, हो ना???

कवी - स्पृहा जोशी 

Post a Comment

0 Comments