Advertisement

माझी आन माझा अभिमान
 मातृभाषा


माझी आन माझा अभिमान , अशी माझी एक भाषा

जिच्यामुळे आहे आमची ओळख , अशी मराठी माझी मातृभाषा..


आदर नाही जिथे आपल्या मराठी संस्कृतीचा , करू नका तिथे सेवा

अमृतातेही पैजा जिंके , ज्ञानेश्वरांचे बोल हे ध्यानी ठेवा..


अभंगामध्ये तल्लीन होऊन , विठ्ठलाच्या चरणी झोकून द्यावे

ओवी मधून गात राहावे , तर आरत्यांमध्ये रंगून जावे ...


मराठी माझी माऊली , जशी भक्तास विठोबाची सावली

कितीही झालो सुशिक्षित , मराठी भाषा साथ देई प्रत्येक पाऊली ..


भावना मांडताना देते ती साथ , अडकलेल्या शब्दांना दाखवते वाट

कधी राहते गप्प तर कधी , बडबडत राहते भरमसाठ..


मराठी मातीतूनच फुलला ,  थोर नेत्यांचा इतिहास 

पाहुनी त्यांची कामगिरी , धाडसाचे मिळत जातात घास..


हर हर महादेव हे , शब्द च जीवाला आधार देई

छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की , आपसूकच तोंडातून जय येई..


अभिमानच नाही तर गर्व आहे , माझ्या भाषेचा , मी मराठी असल्याचा 

आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी , मराठ्यांना दिलेल्या हिम्मतीचा..


मराठी भाषा वळवेल तशी वळते , कधी समोरच्याला धीर देते

भांडणामध्ये आवाज वाढवते तर प्रेमाचे बोलदेखील बोलते..


हिंदी इंग्रजी कन्नड गुजराती , जसे लोक तशी मातृभाषा न्यारी

दुनिया जरी फिरलो तरी प्रत्येकाची मातृभाषा असते त्याला प्यारी..

असते त्याला प्यारी...


मराठी भाषा दिनाच्या खुप खुप शुभेच्छा.....
अमृता भिकाजी राणे

विनायकवाडी , आजरा

Post a Comment

0 Comments