Advertisement

ऐकावसं वाटलं पाहिजे... ऐकावसं वाटलं पाहिजे...


ऐकावसं वाटलं पाहिजे

बोलणं आपलं समोरच्याला..

तरच खरा अर्थ असतो

विचार आपले व्यक्त करण्याला..


दोन्ही विरोधाभास

नुसतंच ऐकण अन् समजून घेणं..

अपेक्षित असतं एवढंच

समजून प्रतिसाद देणं..


मन ही उगाच 

नाही त्या अपेक्षा करत..

अनपेक्षित घडलं की

स्वतःच कुढत बसत..


नको ना कसली अपेक्षा आता 

नको थाट काही बोलण्याचा..

आपणच घ्यावा निर्णय 

योग्य तिथं थांबण्याचा..


 कवियत्री- तनुजा इंगळे-  महाजन 

Post a Comment

0 Comments