Advertisement

कविता मज सुचेना


कविता आहे लिहायची 
पण काही केल्या सुचेना।। 
विचारांची जमवाजमव 
करु कशी कळेना। 
शब्दांची बांधणी होऊन
वाक्य तयार होईना। 
कविता आहे लिहायची
पण काही केल्या सुचेना।। 
अक्षरांपासून कवितेपर्यंतचा
प्रवास पूर्णच होईना। 
छोटे से विचार माझे
कवितेत बंधले जाईना। 
विस्कळीत अक्षर अन्
शब्द एकत्रित येईना। 
कविता आहे लिहायची
पण काही केल्या सुचेना ।। 
सुचली मला कविता
पण लेखणीच लिहेना। 
त्यातील शाईच 
कागदावर टिपेना। 
कविता आहे लिहायची
पण काही केल्या व्यक्त च होईना।। 
मनातील कविता
बाहेर च येईना। 
माझ्या या कवितेला 
कागदावर जागाच मिळेना। 
कविता आहे लिहायची
पण काही केल्या व्यक्त होईना।। 
                   

Post a Comment

0 Comments