Advertisement

अष्टाक्षरी | माय मराठी

                             


अष्टाक्षरी
माय मराठी
 
आम्ही मुले भाग्यवान
 माय मराठीची शान
गाऊया हो गुणगान
वाटे आम्हा अभिमान

ज्ञानेश्वर ,तुकाराम
 महात्म्यांची पुण्यभूमी 
 मराठीच मायभूमी
आहे ती हो कर्मभूमी

 शब्दफुले उधळून 
मराठीच लिहू  वाचू
शब्दशब्द ओवीबद्ध
ताला सुरात ही नाचू

अमृताहूनी गोडी
साहित्यिक रंगभरी
थाटमाट आगळाच 
गातागाणी स्वादन्यारी

मराठी ही राजभाषा
मराठीच दावी दिशा
मराठीच माझी आशा
उंचावली मातृभाषा

- अंजू येवले

Post a Comment

0 Comments