Advertisement

तुझ्या बापाच्या तोंडात नाही घासतुझा कुत्रा खातो च्यवनप्राशतुझा बाप उपाशी मित्रा
तू पोसतेस इंग्लिश कुत्रा...

तुझ्या जगण्यासाठी जिवन केले नाश
देवा धर्माचे कितीक केले उपास
तुझ्या बापाच्या तोंडात नाही घास
तुझा कुत्रा खातो च्यवनप्राश
तुझ्यासाठी नवस केले सतरा ।।१।।

कित्येक जागून काढल्यारे रात्री
तुझे जीवन शिक्षणाचे साठी
त्याचे हाती दिली तू रे लाकडी काठी
स्टील साखळी इंग्लिश कुत्र्यासाठी
शंभर गाठी त्याचे धोतरा..।।२।।

बाप खोकलत घरात चकरा मारी
तुझ्याइंग्लिश कुत्र्यासाठी गाडी सफारी
जिवन काढले खाऊन अर्धी भाकरी
तुझा कुत्रा खातो चिकन बिस्कीट मेरी
तू बदल आपल्या चरित्रा..।।३।।

बाप बिमार नाही चादर अंगावर
बाप सोडला पोराने वाऱ्यावर
साऱ्या घराची नजर कुत्र्यावर
बाप खाली कुत्रा बसतो सोफ्यावर
बंद कर सोंग धतुरा..।।४।।

कवी - योगेश वाडीभस्मे

Post a Comment

1 Comments

तुमची येण्याची जाणीव आम्हाला कमेंट्स द्वारे द्या...