Advertisement

मी व्यथांना अंतरीचे गाव देतो


मी व्यथांना अंतरीचे गाव देतो

आसवांना पावसाचे नाव देतो

सागराने ऐनवेळी घात केला

वादळाहातीच आता नाव देतो

मागतो जो तो फुले ताजीतवानी

कोण निर्माल्यास येथे भाव देतो?

खेळुनी झाले पुरे आयुष्य माझे

ये अरे मृत्यो ! तुलाही डाव देतो

हासलो आजन्म खोट्या चेहऱ्यांनी

आज दुःखाला जरासा वाव देतो.

– प्रसन्न शेंबेकर

Post a Comment

0 Comments