Advertisement

प्रेमाचा प्रस्ताव होय किंवा नाही

प्रेमाचा प्रस्ताव होय किंवा नाही
सांग तुझ्या मनातले
झुरतो मी गं तुझ्यासाठी,
आयुष्याच्या प्रवासात
प्रेमाच्या एका क्षणासाठी.......

हृदय ठेवलेय मी जपून
तुझ्या एका होकारासाठी,
सांग प्रिये कधी येशील
धावून तू माझ्यासाठी.....

रात्रंदिन मज ध्यास तुझाच
विरह आता सोसवेना गं,
प्रेमाचा प्रस्ताव तू माझा
आतातरी स्विकार ना गं......

तळमळतो हा जीव असा
तुजसाठी झालो वेडापिसा,
घेऊन हात हाती माझा
दे थोडातरी असा दिलासा......

तूच माझ्या अंतःकरणी नांदते
नजरेत भरली तुझीच छबी,
आयुष्याच्या ऊंबर्यावर फक्त
मूर्ती तुझीच आहे ऊभी......

आठव ती प्रीत राधा-कृष्णाची
आठव ती रीत मीराबाईची,
सुखकल्लोळ हा प्रेमातला
गोडी वाढवेल जगण्याची....

नकोस आता दूर जाऊस
प्रस्ताव माझा स्विकार कर,
आयुष्याच्या मैफिलीत मग
जगणे सुंदर कर....

कवी - श्रीम.जया वि.घुगे-मुंडे
     

Post a Comment

0 Comments