Advertisement

घाणेरडे इशारे पदराच्या टोकाने....
वासनेनं बरबटलेल्या नजरा आन, 

प्रामाणिक पणाचा आव आणत... 

जिवंत देहा भोवती जमलेली गिधाड.

जेव्हा केला जातो 'ती ' नजरेनं नं दिसणारा बलात्कार...... 

तेव्हा ती जळत असते नखशिखांत आणि करत असते त्या नजरांचा स्वाहाकार..... 

झाकत असते त्यांचे ते घाणेरडे इशारे पदराच्या टोकाने, अन चालत राहते दुर्लक्षित करून पुढेच पुढे.... 

अन त्यांचे चाललेले असतात चाळे दारू पिऊन भपकारे सोडत नेटाने.... 

आड वाटेनं येता जाता ऐकाव्या लागतात टीका आन  चालावं लागत पुढे न घालता त्या टीकांना भीक... 

कदाचित नसते धमक प्रत्येकीच्या मनगटात जाब विचारायची. 

किंवा असतात पायात बेड्या आन भीती ही आपल्याच समाजाची... 

आपला म्हणवणारा तोच समाज ज्या वर सत्ता त्याच समाज कंटकाची त्यांना शपथ असते कदाचित आपल्याच लेकी बळीला खुंटीला बांधून ठेवण्याची.... 

गुदमरतो जीव अस्यात मोकळा श्वास ही नशिबी नाही... 

शापित सौदर्याची कदाचित शापित ही ग्वाही.... 


लेखक - मधुरा खाडे 


Post a Comment

1 Comments

तुमची येण्याची जाणीव आम्हाला कमेंट्स द्वारे द्या...