Advertisement

वाट चुकली माझी


                                       मन कवितावाट चुकली माझी, गेली तिच्या दाराशी 
नाही आवरलं मन ,भेटाया सखेशी

मन व्ह्यत ताब्यात, चार भिंतीच्या आत 
दाटला विरह ,सुटलं वाऱ्यागत 

मन धावल धावल ,जश रानातल पाखरू
नाही थांबलं मन , जश गोठ्यातल वासरू

तिच्या स्वरात तालात ,मन झाल लहरी 
दिसली सासू रागात ,मन बसलं पायरी 

तिच्या केसात खळीत, रात गेली स्वप्नात
अमावशेला चांदण्याची निघाली वरात 

मुक्काम केला गावी ,पहाटेच्या राती 
नाही भेटली मैना ,मन निघालं परती 

Post a Comment

0 Comments